e-KYC प्रक्रिया मार्गदर्शक
महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा (Ladki Bahin Yojna) लाभ अखंडित मिळवण्यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलेला e-KYC करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून सहज पूर्ण करू शकता.

e-KYC करण्यासाठी ५ सोप्या स्टेप्स
1अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या (Visit Official Website)
सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
होमपेजवर गेल्यावर तुम्हाला 'e-KYC' संदर्भातील बॅनर किंवा लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
2अर्जदाराची आधार पडताळणी (Applicant Aadhaar Verification)
नवीन पेज ओपन झाल्यावर लाभार्थी महिलेची ओळख पटवण्यासाठी खालील माहिती भरा:
- आधार क्रमांक: लाभार्थी महिलेचा १२ अंकी आधार नंबर अचूक टाका.
- कॅप्चा कोड (Captcha): स्क्रीनवर दिसणारे अक्षर/अंक जसेच्या तसे बॉक्समध्ये भरा.
- OTP प्रक्रिया: 'मी सहमत आहे' (I Agree) या चेकबॉक्सवर टिक करा आणि 'Send OTP' (ओटीपी पाठवा) बटनावर क्लिक करा.
तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाकून 'Verify' किंवा 'Submit' करा.
3पती किंवा वडिलांची माहिती (Family Head Verification)
या स्टेपमध्ये तुम्हाला कुटुंबातील प्रमुख व्यक्तीची पडताळणी करावी लागेल:
- विवाहित महिलांसाठी: त्यांनी आपल्या पतीचा आधार क्रमांक टाकावा.
- अविवाहित मुलींसाठी: त्यांनी आपल्या वडिलांचा आधार क्रमांक टाकावा.
पुन्हा एकदा कॅप्चा कोड टाकून OTP मागवा. यावेळी संबंधित व्यक्तीच्या (पती किंवा वडील) मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिट करा.
4प्रवर्ग आणि हमीपत्र (Category & Declaration)
आधार पडताळणीनंतर एक फॉर्म ओपन होईल, तिथे खालील माहिती द्यायची आहे:
- जात प्रवर्ग (Caste Category): तुमची योग्य जात/प्रवर्ग (SC, ST, OBC, General इ.) निवडा.
- हमीपत्र (Declaration): तिथे दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील:
- कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे का? (पात्र होण्यासाठी 'नाही' किंवा 'होय' योग्य तो पर्याय निवडा).
- कुटुंबातील लाभार्थी महिलांची संख्या नियमानुसार आहे का?
ही माहिती वाचून योग्य पर्यायावर टिक करा.
5अर्ज सबमिट करा (Final Submission)
वरिष्ठ माहिती अचूक असल्याची खात्री करा. सर्व रकाने भरून झाल्यावर 'Submit' बटनावर क्लिक करा. तुमची e-KYC प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण (Success) झाल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसेल.
महत्त्वाच्या सूचना (Important Notes):
- • सर्व्हर समस्या:जर वेबसाईट स्लो असेल किंवा 'Unable to send OTP' असा एरर येत असेल, तर काही वेळानी किंवा रात्रीच्या वेळी प्रयत्न करा.
- • वार्षिक प्रक्रिया:ही e-KYC प्रक्रिया दरवर्षी करणे आवश्यक असू शकते, त्यामुळे अपडेट राहणे गरजेचे आहे.
- • कागदपत्रे:e-KYC करण्यासाठी स्वतःचे आणि पती/वडिलांचे आधार कार्ड आणि लिंक असलेला मोबाईल जवळ ठेवा.
ई-केवायसी करताना काही अडचण येत आहेत?
(Troubleshooting & FAQs) खालील उत्तरे तपासा:
तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करा (Ensure mobile linked with Aadhaar). नेटवर्क तपासा किंवा काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा. सर्व्हर समस्या (Server Issue) असल्यास रात्रीच्या वेळी ट्राय करा.
आधार कार्डवरील १२ अंकी क्रमांक (12-digit Aadhaar No) पुन्हा एकदा नीट तपासा आणि खात्री करूनच सबमिट करा. टाईपिंग मिस्टेक टाळा.
जर तुम्ही 'Face KYC' करत असाल, तर पुरेसा प्रकाश असलेल्या ठिकाणी (Well-lit area) उभे राहून पुन्हा स्कॅन करा. कॅमेरा लेन्स स्वच्छ करा.
एकाच वेळी अनेक जण अर्ज करत असल्याने वेबसाईटवर ट्रॅफिक (High Traffic) असू शकते. पेज रिफ्रेश करा किंवा सकाळी लवकर / रात्री उशिरा e-KYC करा.
साधारणतः २४ ते ४८ तासात (24-48 Hours) ई-केवायसी अपडेट होते. अर्जाची स्थिती (Application Status) तपासण्यासाठी पोर्टलवर लॉग इन करा.
अजूनही काही शंका आहे? आम्हाला संपर्क करा