पात्रता निकष
कोण अर्ज करू शकते आणि कोण नाही?
पात्रता (Eligibility)
- महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
- राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
- किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
- लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
अपात्रता (Ineligible)
- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
- शासनाच्या इतर आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असलेल्या महिला.
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार असल्यास.
- कुटुंबातील सदस्य सरकारी बोर्ड/कॉर्पोरेशनचे अध्यक्ष/संचालक असल्यास.
- कुटुंबात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असल्यास.
पुढील पाऊल काय?
जर तुम्ही पात्र असाल, तर अर्ज करण्याची प्रक्रिया आणि कागदपत्रे तपासा.